लोकशाहीत विरोध करत असताना कोणाच्या घरापर्यंत जाऊ नये

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांवर बोचरी टीका केली. ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही बीकेसीवरील मेळाव्यातून सडेतोड उत्तर दिलं. ‘बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना उद्देशून केली. या टीकेवरुन आता शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे.

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणावरुन नाराजी वर्तवली आहे. लोकशाहीत विरोध करत असताना कोणाच्या घरापर्यंत जाऊ नये, कोणाच्या नातवापर्यंत जाऊ नये, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेच राजकारणात टीका करताना अपशब्द वापरले जात असल्याची खंत देखील संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करणं कमीपणाचं आहे. त्यांच्या नातवाचा भाषणात उल्लेख करणं चुकीचं आहे, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Team Global News Marathi: