अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिक प्रवासी? पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

 

आज पहाटेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद रोडवर खाजगी बसला आग लागून १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली आहे. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बसमधील काही क्षणात जळून खाक झाली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले होते का? नेमका हा अपघात कशामुळे झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स मध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले असल्याचे निदर्शनास येत असून त्याची चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. त्यांनी अपघात झाल्यानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्स च्या कार्यालयात भेट दिली. नाशिक जिल्हाधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला. शिवाय ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांबाबत माहिती घेतली. आग लागण्यामागे कारण काय, ट्रॅव्हल्स बस मध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती काय याबाबत माहिती घेऊन मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या.

दरम्यान नाशिक बस अपघात दुर्घटनेबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी बी. गंगातरण यांनी एबीपी माझाला महत्वाची माहिती दिली आहे. पहाटे या खासगी बसचा अपघात होताच ट्रकच्या इंधनाच्या टाकीत हिट झाल्याने स्फोट झाला असल्याचं जिल्हाधिकारी म्हणालेत. तसेच या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळख पटू शकत नाही. DNA आणि ईतर फॉरेन्सिक टेस्ट केल्यानंतरच योग्य माहिती दिली जाईल, तसेच नातेवाईकांसाठी टोल फ्री नंबरची सुविधा देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: