लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन

 

लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रसच्या चार खासदारांचे पावसाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे. लोसभेत सोमवारी कुटुंब न्यायालय(सुधारीत) विधेयक 2022 विचारविनिमय आणि मंजुरीसाठी सुचीबद्ध करण्यात आले आहे. हे विधेयक कायदामंत्री किरेन रिजिजू पटलावर ठेवणार आहेत.

लोकसभेत नियम 193 नुसार खेळांची गरज आणि सरकारकडून उचलण्यात आलेली पावले यावर चर्चा होत आहे. राज्यसभेत सामुहिक विनाशासाठी शस्त्रास्त्रे आणि त्याच्या पुरवठा पद्धतीवर चर्चा सुरु आहे. यावेळी सदनात गोंधळ घालण्यात आला.

लोकसभेत पीठासीन राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर कारवाई केली आहे. त्यांनी नियम 374 नुसार जाणूनबुजून सभागृहात गोंधळ घालणे, अध्यक्ष पीठासमोर येत गोंधळ घालणे आणि सदनातील नियम न पाळता नियमांचा दुरुपयोग करणे ही कारणे देत त्यांनी काँग्रेसचे मणिक्कम चॅगोर, टीएन. प्रतापन, ज्यातिमणी, रम्या हरिदास यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. त्यानंतर सर्वसहमतीने पूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतरही गोंधळ सुरुच असल्याने कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: