लोकसभा निवडणूक: भाजपच्या ‘मिशन ४५’ साठी ठरली स्टॅस्ट्रेजी; सेना-राष्ट्रवादी च्या मतदारसंघावर लावणार जोर

लोकसभा निवडणूक: भाजपच्या ‘मिशन ४५’ साठी ठरली स्टॅस्ट्रेजी; सेना-राष्ट्रवादी च्या मतदारसंघावर लावणार जोर

२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात भाजप नेत्यांची बैठक

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात जोर लावण्याचे प्लॅनिक केले

शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या १८ मतदारसंघांवर भाजपचे विशेष लक्ष असणार आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या तयारी आणि रणनिती ठरविण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, श्रीकांत भारती, आशिष शेलार, राम शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपच्या ४५ जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने मिशन ४५ ची घोषणा करण्यात आली. एकंदरित आतापासून तयारी सुरु केल्याने २०२४ च्या निवडणुकीचे भाजपने रणशिंग फुंकले आहे. (Strengthen Satara-Baramati-Maval, strategy for BJP’s ‘Mission 45’)

यावेळी फडणवीस म्हणाले, “ज्या जागा आम्ही जिंकलो आहोत, त्याच्यावर तर आमचं लक्ष आहेच. पण आम्हाला ज्या जागा जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रीय करतोय. १६ मतदारसंघ आम्ही निवडलो आहेत, याव्यतिरिक्त ८ मतदारसंघावर आम्ही अधिक लक्ष ठेवणार आहोत, असं सांगत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेच्या काही जागा निवडल्या आहेत. ज्या जागांवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत करणार आहोत”.

मिशन ४५ साठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे कोऑर्डिनेट करत आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १६ मतदारसंघ निवडले आहेत. पैकी १० मतदारसंघ शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत. त्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी एक प्रभारी नेमला आहे. त्यामध्ये बुलढाणा- खा. अनिल बोंडे, हिंगोली- आमदार राणा जगजीतसिंग, पालघर- नरेंद्र पवार, कल्याण- संजय केळकर, दक्षिण मध्य मुंबई – प्रसाद लाड, दक्षिण मुंबई – संजय उपाध्याय, शिर्डी- राहुल आहेर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – आशिष शेलार, कोल्हापूर- सुरेश हळवणकर, हातकणंगले- गोपीचंद पडळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

या प्रभारींनी संबंधित लोकसभा मतदारसंघातल्या सर्व तालुक्यांमध्ये फिरुन केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्यास सांगितलं आहे. शिवाय वेळोवेळी मतदारसंघातील दौरे, जनतेच्या भेटीगाठी, सभा-संमेलनं असा तगडा कार्यक्रम आखण्याचं भाजपने सुचवलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: