विधान परिषद निवडणूक : फडणवीसच किंगमेकर ठरतील, शिवसेनेचे आमदार फुटतील

विधान परिषद निवडणूक : फडणवीसच किंगमेकर ठरतील, शिवसेनेचे आमदार फुटतील

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या ( Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराला पराभवाची धूळ चाखावी लागली होती. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. शिवसेना आणि समर्थक आमदारांची बैठक दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीपर्यंत पवई येथील हॉटेल रिनॉसन्समध्ये या आमदारांना ठेवले जाणार आहे. आणि याच मुद्द्यावरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh rane)यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली.

राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत (Sanjay Raut)यांचे डोळे पांढरे झाले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)अजूनही राज्यसभेच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. एवढा घाबरलेला मुख्यमंत्री मी अजून पाहिला नाही. शिवसेनेचे आमदार या निवडणुकीत विरोधात मतदान करतील. शिवसेनेनं व्हिप बजवला नाहीतर शिवसेनेचे आमदार फुटतील. मुख्यमंत्र्यांकडे विरोधी आमदारांची लिस्ट नाही, असा महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री बघायला मिळाला. असे निलेश राणे म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांचे डोळे पांढरे झाले. राज्यसभेच्या निवडणुकीत गणित कच्चा असलेला मोहरा म्हणजे संजय राऊत होता. राज्यसभा निवडणुकीत काय झाले हे संजय राऊत यांनी पहावे. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणणार. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेच या निवडणुकीत किंगमेकर ठरतील. जे राज्यसभेचे झाले तेच विधान परिषद होणार, असा दावाही निलेश राणे यांनी केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: