संजय राऊत यांच्यासारख्या सोंगाड्यावर काय बोलायचं?; प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर

 

सेनाभवन फोडण्याचे विधान केल्याप्रकरणी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली होती. संजय राऊत त्यांनी केलेल्या टीकेला आमदार प्रसाद लाड यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.

‘शिवसेना भवन फोडू अस मी म्हणलंच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला असून माझ्यासाठी हा विषय संपला आहे. मात्र, माझ्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यासारख्या सोंगाड्यावर काय बोलायचं?,’ असा प्रश्न करीत लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करून ही टीका केली आहे.

महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. अशी टिक्का राऊत यांनी केली होती. त्यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईत केलेल्या वक्तव्याबद्दल पुन्हा खुलासा केला.

लाड म्हणाले कि, आपण शिवसेना भवन फोडू अस मी म्हणलंच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. तशा स्वरूपाची मी प्रसिद्धी माध्यमांना माहितीही दिली आहे. त्यामुळे आता कुणीही यापुढे माझ्या वक्तव्याचा विपर्यास करू नये.

शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही, असेही स्पष्टीकरण लाड यांनी यावेळी दिले.

Team Global News Marathi: