सरकार राखी तो वसुली चाखी, मनसेने पुन्हा साधला सत्तेत असेलेल्या शिवसेनेवर निशाणा !

 

मुंबई महानगर पालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्व विरोधकांनी जोरदार तयारी सूर केली आहे. ऐकीड़े भाजपने सुद्धा मुंबई मनपाची सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केलेली असताना दुसरीकडे मनसे सुद्धा रिंगणात उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई मानपामध्ये सुरु असलेल्या भ्रष्ट्राचारावर बोट ठेवले आहे.

संदीप देशपांडे यांनी कोविड सेंटरच्या कारभारावरुनही शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधला होता. महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडूनही तयारी सुरू असून महापालिकांच्या कारभारावर टीका करण्यात येत आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आणि राज्य सरकारच्या कारभारावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. देशपांडे यांनी ट्विट करत कमिशन आणि वसुली तसेच पुण्याती फुकट बिर्याणीवरुन महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत नव्या म्हणींसाठी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “पाहिले एकच म्हण होती” तळे राखी तो पाणी चाखी”या सरकारच्या काळात अनेक नव्या म्हणींचा जन्म झालाय”शहर राखी तो बिर्याणी चाखी” “महापालिका राखी तो कमिशन चाखी” सरकार राखी तो वसुली चाखी”मराठी भाषेला नवीन म्हणी बहाल केल्याबद्दल मुख्यमंत्रांचे जाहीर आभार. आमचा सी.एम जगात भारी” अशी खोचक टीका केली आहे.

 

Team Global News Marathi: