‘वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय ठरले’ पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक |

 

मुंबई | राज्यात आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट उभारले होते. या संसर्गाचा संपूर्ण देशाला सुद्धा मोठा फटका बसला होता. या कठीण काळात सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संसर्ग रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते. कोरोनाकाळात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिला क्रमांक पटकवला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आज सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पवारांनी मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

दरम्यान, प्रेश्नम या संस्थेने भारतातील विविध राज्यांसाठी मुख्यमंत्री त्रैमासिक मान्यता रेटींग सुरु केली आहे. प्रेश्नमने केलेल्या सर्वेक्षनानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाकाळात उत्तम कामगिरी केल्यामुळे सर्वाधिक पसंती मिळवली आहे. प्रेश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केलं आहे. उद्धव ठाकरे हे देशातील १३ राज्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकवणारे मुख्यमंत्री ठरले आहेत.

Team Global News Marathi: