पाहूया काय होतंय ते : वानखेडेंची नोकरी की मलिक यांचे मंत्रिपद जातंय ते रामदास आठवले

पाहूया काय होतंय ते : वानखेडेंची नोकरी की मलिक यांचे मंत्रिपद जातंय ते रामदास आठवले

सातारा: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एक वर्षात नोकरी घालवणार असं विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं होतं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिक यांचं मंत्रिपद जातं हे पाहुया, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.

रामदास आठवले आज कराड दौऱ्यावर होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना आठवले यांनी हे विधान केलं. वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचे मंत्रीपद जातंय ते पाहुया, असं आठवले यावेळी म्हणाले. आर्यन खान प्रकरणात पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणता येणार नाही. आरोप होतायंत मात्र पूर्ण चौकशी केल्यानंतर आर्यन खानसह इतरांना ताब्यात घेण्यात आले आहे.

न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला आहे. याचा अर्थ असा की त्याच्या विरोधात NCB कडे सबळ पुरावा आहे. त्यामुळे आरोप करणे योग्य नाही. सुशांत सिंग प्रकरणानंतर फिल्म इंडट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होतोय हे सिध्द झाले आहे. त्यामुळे पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणणे योग्य ठरणार नाही. जी माहिती मिळतेय त्याप्रमाणे कारवाई केली जातेय, असंही ते म्हणाले.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: