शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर दिवाळीच्या मुहूर्तावर घ्या हे 9 शेअर्स SMC ग्लोबलचा सल्ला

ग्लोबल न्यूज: दिवाळीच्या मुहूर्तावर घ्या हे 9 शेअर्स, SMC ग्लोबलचा सल्लादिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर SMC Global ने तुमच्यासाठी 9 शेअर्सची निवड केली आहे. हे शेअर्स येत्या काळात चांगली कमाई करू शकतात असे ब्रोकरेज फर्म एसएमसी ग्लोबलने आपल्या अहवालात म्हटले आहे.

भारतीय स्टेट बँक (SBI)एसबीआयच्या उत्पन्नात चांगलीच वाढ होत आहे. त्याचबरोबर त्याचे क्रेडिट लॉग देखील खाली आले आहे. ब्रोकरेजने एसबीआयला 577 रुपयांच्या टार्गेट किमतीसह बाय रेटिंग दिले आहे. एसबीआयचे शेअर्स पुढील 8-10 महिन्यांत या किमतीत पोहोचू शकतात असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

आयसीआयसीआय बँकबँक सध्या कर्जाच्या वाढीऐवजी किमान जोखमीसह आपला ऑपरेटिंग नफा वाढवण्यावर भर देत आहे. म्हणूनच, पुढील 8-10 महिन्यांत हा शेअर 874 रुपयांवर पोहोचू शकतो अशी अपेक्षा आहे असे एसएमसी ग्लोबलचे म्हणणे आहे.

 

एल अँड टी ( L & T)ही कंपनी भारतातील ई अँड सी विभागात नंबर एकवर कायम राहील आणि भविष्यात देशातील पायाभूत सुविधांवर होणाऱ्या प्रचंड खर्चाचा फायदा कंपनीला होईल . SMC ने यासाठी 2120 रुपयांचे टारगेट दिले आहे.डीएलएफ (DLF)कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्यवसायावर परिणाम होत असताना, डीएलएफने आपली आर्थिक कामगिरी कायम ठेवली आहे.

अशा स्थितीत, ब्रोकरेजने या स्टॉकसाठी 474 रुपये टारगेट दिले आहे.एंड्यूरंस टेक (Endurance Tech)कंपनीची बॅलॅन्स शीत मजबूत आहे आणि त्याची लिक्विडिटी पोझिशन सुद्धा चांगली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी सरकारने अनेक मदत उपायांची घोषणा केली आहे. याचाही फायदा कंपनीला होईल. एसएमसीने पुढील 8-10 महिन्यांसाठी स्टॉकला 2,047 रुपयांचे टारगेट दिले आहे.वेल्सपुन इंडिया (Welspun India)ब्रोकरेजने या स्टॉकसाठी 193 रुपयांचे टारगेट दिले आहे. ही कंपनी दीर्घकाळापर्यंत शाश्वत आणि फायदेशीर वाढ साध्य करेल असा विश्र्वास ब्रोकरेज फर्मला आहे.

प्रेस्टिज इस्टेट्स (Prestige Estates)अनेक आव्हाने असूनही, प्रेस्टीजने तिमाहीत विक्रमी विक्री केली. कंपनीने अनेक नवीन प्रकल्पही सुरू केले आहेत ज्यामुळे त्याची विक्री वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या स्टॉकसाठी 529 रुपयांचे टारगेट दिले आहे.केईसी इंटरनॅशनलKEC सध्या चांगली कामगिरी करत आहे. सोबतच टी अँड डी डोमेस्टिक, रेल्वे आणि नागरी विभाग त्याला वाढीसाठी मदत करतील असा विश्वास मॅनेजमेंटला आहे .

ब्रोकरेजने त्यांना 8 ते 10 महिन्यांच्या कालावधीसाठी 555 रुपये टारगेट दिले आहेफिलिप्स कार्बन ब्लॅक”मालवाहतुकीत सुधारणा आणि रस्ते बांधणीत वाढ, सरकारचे पायाभूत सुविधांवरील लक्ष, ई-कॉमर्सची सतत वाढती मागणी, खाण व्यवसायात वाढ यामुळे या कंपनीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. एसएमसीने या स्टॉकसाठी 294 रुपयांचे टारगेट दिले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: