त्रास देणाऱ्या गोष्टीनां, माणसांना,अनं विचारांना फाट्यावर मारून जगुया.. ; वाचा कसे ते

त्रास देणाऱ्या गोष्टीनां, माणसांना,अनं विचारांना फाट्यावर मारून जगुया.. ; वाचा कसे ते
जागृती सारंग

जेव्हा एखादी जबाबदार, समजुतदार व्यक्ती अचानक आपल्याला म्हणते की नकोसं झालंय आयुष्य, असं वाटतं संपवून टाकावं एकदाचं! तेव्हा आपल्या काळजाचा ठोका एका क्षणासाठी चुकतोच. पण मग अशावेळी आपण त्या हुशार, जबाबदार, समंजस व्यक्तीला काय सांगावं हेच कळत नाही. तरीही आपण प्रत्येकजण आपापल्या परिने त्यांना त्या विचारापासून परावृत्त तर करत राहतोच पण आपण स्वतःसुद्धा प्रत्येकजण आयुष्यात किमान एकदा तरी या फेझमधून गेलेलो असतो. मनातल्या मनात तर कित्येकांनी हा आत्महत्येचा विचार कैकवेळा केलेला असतो. आणि कित्येकदा या विचाराचीच हत्या करुन त्यावर मात करुन आपण जगत आलेलो असतो.

आयुष्य सुंदर असलं तरी मरणं सोप्पं आहे पण जगणं खरंच कठीण आहे. स्पर्धा, इर्षा, अपयश, संघर्ष, दुःख, नकार, गरिबी हे सगळं कोणालाच चुकलं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात हे कमी-अधीक प्रमाणात असतंच. पण कधी कधी काहींच्या वाट्याला हे जास्त किंवा आयुष्यभर असतं आणि ते सत्य स्विकारलं गेलं नाही कि मग हे आत्महत्येचे विचार मनात डोकावले जातात.

स्पर्धेच्या युगात टिकाव लागावा म्हणून पालकांचं आपल्या मुलांवर अभ्यासाचं तसेच इतर एॅक्टिव्हिटिजचं प्रेशर टाकलं जातं जे काही मुलांना त्यांच्या कुवतीपलिकडलं असल्यामुळे मनात भय निर्माण करतं आणि नंतर नैराश्य. पालकांचं मुलांना सतत टोचून बोलणं, चारचौघात इतर मुलांशी तुलना करुन ऐकवणं या गोष्टीसुद्धा मुलांना नैराश्याकडून आत्महत्येकडे जाण्यास प्रवृत्त करतात.

जाणून घ्या ; कुलदैवत म्हणजे नेमकं काय ? कसे ओळखाल आपले कुलदैवत ?

आवडत्या व्यक्तीने प्रेमासाठी वा लग्नासाठी नकार देणे, किंवा आधी होकार देऊन वर्षानुवर्षे रिलेशनशिपमध्ये राहून नेमक्या वेळी साथ न देता हात सोडून जाणे, एखाद्या मुलीला लग्नासाठी सतत नकार मिळणे आणि त्यावरुन नातेवाईकांमध्ये सतत चर्चा होणे, प्रेमात सतत फसगत होणे, व्यसने लपवून, खोटे शिक्षण किंवा जास्तीचा पगार सांगून, आजारपणे लपवून लग्न जुळवणे आणि करणे, लग्नानंतर जोडीदाराने समजून न घेता शुल्लक कारणांमुळे साथ सोडणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हुंडाबळीचा शिकार होणे, डोमेस्टिक व्हायलन्स, नोकरी न मिळणे, कॉर्पोरेट मधले स्पर्धात्मक युग आणि नोकरी-व्यवसायामधील पॉलिटिक्स या आणि अशा अनेक सर्व गोष्टी तरुणाईला नैराश्याच्या जाळ्यात ओढू पाहतात.

या नैराश्यामुळेच मग आत्महत्येचे विचार मनात येतात. हल्ली दर दहा माणसांमागे किमान एक व्यक्ती नैराश्यात असते. जो तो मनात एक आशा जिवंत ठेऊन मुखवटा घेऊन जगत असतो. पण ज्या प्रकारे आपल्या शरीराची आपण काळजी घ्यायला हवी असते त्याप्रकारे आपण आपल्या मानसिक आरोग्याची देखिल काळजी घ्यायची असते.

युती केली हेच चुकलं | अन्यथा विधानसभाला १५० जागांच्या पुढे गेलो असतो – फडणवीस

नेमकं तिथेच प्रत्येकजण सहजपणे दुर्लक्ष करतो. कित्येकदा स्वतःच्या भावनांचा मनातल्या मनातच वैचारीक खून केला जातो, कधी जवळच्यांसाठी तर कधी समाजासाठी. ज्यातून चिंता, एकलकोंडेपणा, नैराश्य, मानसिक ताण, मानसिक आघात हे सर्व वाढत जाते आणि जर योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर त्याचे परिणाम आत्महत्येकडे झुकण्यात जास्त प्रबळ होत जातात.

त्रास होणाऱ्या या गोष्टींना, माणसांना, विचारांना फाट्यावर मारुन जगता यायला हवं. सुख असो वा दुःख सगळंच काही काळापुरतं असतं.

मी ब्राह्मण म्हणून मला टार्गेट केलं जातंय ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

राग, दुःख, चिडचिड, चिंता, उदासिनता, मानसिक गोंधळ, कोलाहल, मानसिक आघात, निराशावाद, एकटेपणा आणि इतरही अशा प्रकारच्या भावना सतत जाणवत असल्या की नैराश्य हे आलंच! अशा वेळी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी जे करता येईल ते करावं –

एक तर विश्वासू व्यक्तीसह बोलावं.
विश्वासच उडाला असेल तर अनोळखी पण योग्य व्यक्तीसह बोलावं.कॉमेडी शोज किंवा कॉमेडी पिक्चर्स, कॉमेडी व्हिडिओज पहावेत.पॉझिटिव्ह, एनर्जेटिक, किंवा आवडीची गाणी ऐकावीत.

आवडीचं वाचन करावं.मोटिवेशनल व्हिडिओज पहावेत, ऐकावेत किंवा आपल्या ओळखीच्या सतत मोटिवेटेड असणाऱ्या लोकांच्या संपर्कात रहावं.कोणाला काही सांगायचेच नसेल तर ज्या गोष्टींमुळे नैराश्य आले आहे त्या विसरायचा प्रयत्न करुन इतर विषयांवर इतरांसोबत बोलावं.
जे छंद असतील ते जोपासावेत, ज्या गोष्टी कराव्या वाटतात त्या कराव्यात.

नरेंद्र मोदींच्या काळात लोकशाही रसातळाला गेली : बाळासाहेब थोरातांची टीका

व्यायाम, योगा, डान्स किंवा मेडिटेशन करावे.
घरातील किंवा शेजारी पाजारी असणाऱ्या लहान मुलांसोबत किंवा वृद्धांसोबत वेळ घालवावा.शक्य असल्यास अनाथालयातील मुलांना किंवा वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना जाऊन भेटावे. त्यांच्यासाठी काही आर्थिक मदत नेली नाहीत तरी चालते कारण तुमचा वेळ त्यांच्यासाठी खुप काही असते. त्यांचे दुःख पाहून कदाचित तुम्हाला तुमच्या दुःखाचा विसरही पडेल.

दूरच्या किंवा जुन्या मित्र-मैत्रीणींना, जुन्या कलिगना वा चांगल्या नातेवाईकांना फोन करावे. त्यांच्यासह जुन्या चांगल्या आठवणींवर बोलावे.

आजवर आयुष्यात जे काही यश मिळवलं असेल आणि ते मिळवताना जो संघर्ष केला असेल ते सर्व आठवावं.
आई-वडीलांनी, भावंडांनी किंवा आपल्या पती-पत्नीने वा मुलांनी आपल्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी आठवाव्यात.

अगदीच काही नाही तर शेवटी जर आत्महत्या करावी वाटलीच तर Call वर एकदा कॉल करा.

होय हि सुविधा आपल्या देशात आहे.

२०१२ मध्ये हि सुविधा भारतात सुरु केली गेली आहे. तुम्ही कॉल करु शकता किंवा ईमेलवर वा चॅटिंगवर सुद्धा बोलू शकता. प्रोफेशनल काउन्सेलर्स कडून तुम्हाला तेथून मोफत मदत मिळते. जिथे तुम्हाला तुमच्या भाषेत सर्व सांगता येते, तुम्हाला तिथे जज केले जात नाही, तुमची ओळख सिक्रेट ठेवली जाते, तुम्हाला ऐकून घेतलं जातं, तुमच्या समस्यांवर तुम्हाला कदाचित प्रॅक्टिकल मार्गही शोधून दिला जातो.
अर्थातच गुगलवरच्या माहितीनुसार मी हे सांगत आहे कारण प्रत्यक्षात याची गरज अजून तरी मला पडलेली नाही.

गुगलवर सर्च करा iCall आणि तुम्हाला सर्व माहिती तेथे मिळेल.

फायनान्शियल किंवा मॉरल सपोर्ट खेरीज काहींना इमोशनल सपोर्टची सुद्धा खुप गरज असते. जो एखाद्याला जवळच्यांकडून मिळाला नाही तर निदान या हेल्पलाईन वर तरी मिळेल. फक्त एवढ्यासाठीच हे iCall सर्वांपर्यंत पोहोचवा.

काळजी घ्या, इतरांसोबतच स्वतःचीसुद्धा!

ग्लोबल न्युज नेटवर्क: