इकडे येऊन ते गाजर वाटप करुन गेले असतील आदित्य ठाकरे यांचा नाव न घेता टोला 

 

 

शिवसेना आणि भाजप यांच्यातील लढाई आता पुन्हा एकदा दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकित सुद्धा दिसून आली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सिल्वासा येथे कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

 

कालच याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली होती. हाच मुद्दा पकडत आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, काल इथे महाराष्ट्रातून कोणी येऊन गेले. त्यांनी गाजर वाटप केले असेल. ते महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी इथे एवढे कोटी दिले, तितके कोटी दिले, असे सांगत फिरत असल्याचा टोला आदित्य यांनी लगावला. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून आदित्य ठाकरे यांना काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

आम्ही इथे पक्ष वाढवण्यासाठी नाही आलो, आम्ही गोव्यात गेलो राजस्थानमध्ये गेलो परंतु ही लढाई न्याय हक्कासाठी आहे. डेलकर कुटुंब असेल, दादरा, नगर-हवेली असेल यांच्यासाठी आहे. दोन परिवार एकत्र आल्यानंतर जो उत्साह आहे तो मी पाहिला. डेलकर कुटुंबाचे मी इथे काम पाहिले, योगदान पाहिले. आजचा जनतेचा प्रतिसाद पाहण्यासारखा होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

Team Global News Marathi: