ठाणे आणि पालघरमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणुक लढणार

 

 

ठाणे | उल्हासनगर मनपाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यात भाजपाला जोरदार धक्का दिल्यानंतर आगामी काळात ठाण्यासह पालघरमध्ये महाविकास आघाडी सर्वच निवडणुका एकत्रित लढविणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर काँग्रेसने केलेल्या दाव्याची देखील त्यांनी हवा काढली आहे.

बुधवारी उल्हासनगरमधील तब्बल २१ नगरसेवकांसह १९ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद वाढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. परंतु दुसरीकडे आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढेल असे सांगून त्यांनी काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या स्वबळाच्या दाव्याची हवा काढली आहे.

ते पुढे म्हणाले की, वरिष्ठ हे केवळ कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा म्हणून असा दावा करीत असतात, मात्र प्रत्यक्षात आम्ही एकत्रच निवडणूक लढवू असे त्यांनी स्पष्ट केले. नवीमुंबईत एक एक करुन आम्ही करिष्मा दाखविला आहे असं विधान करत डॉ जितेंद्र आव्हान यांनी थेट भाजपा नेते गणेश नाईक यांना आव्हान दिले आहे.

Team Global News Marathi: