विधान परिषदेच्या मुंबई मतदारसंघासाठी शिवसेनेतून ‘या’ नावांची चर्चा !

 

मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थेमधून माजी मंत्री रामदास कदम यांची जागा रिक्त होणार आहे. तसेच अध्या रामदास कदम यांच्याबद्दल पक्षनेतृत्वामध्ये नाराजीचे सूर असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे या रिक्त जागेवर कदम सोडून शिवसेनेतून इतर काही नावांची जोरदार चर्चा सुरु आहे.

मुंबई मतदारसंघाच्या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे, शिवसेना उपनेते आणि माजी राज्यमंत्री सचिन अहिर, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई, विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

माजी आमदार सुनील शिंदे यांनी २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपली जागा रिक्त केली. त्यामुळे त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्यातच २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश करणारे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांचं नाव देखील चर्चेत आहे.

सध्या शिवसेनेचा नवा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले आणि आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांच्या नावाचीही चर्चा आहे. वरुण सरदेसाई सध्या युवासेनेचे सरचिटणीस आहेत. दरम्यान २०२४ मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचंही बोललं जात आहे.

Team Global News Marathi: