भारतीय जनता पक्षाच्या कृतीला सांगलीतून प्रतिउत्तर, सांगली मनपा निवडणुकीवर शरद पवारांचे वक्तव्य

सांगली-मिरज-कुपवाड महानगर पालिका निवडणुकीत भाजपाकडे संख्याबळ असताना सुद्धा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचा महापौर आणि उपमहापौर विराजमान झाला. यावेळी नवनिर्वाचित महापौर दिग्विजय सूर्यवंशी तसेच जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. यावेळी पवारांनी निवडून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन केले होते.

भाजपने लोकमताचा अनादर करीत काही राज्यांतील सत्ता हस्तगत केली, त्याला प्रत्युत्तर देण्याची सुरुवात सांगलीतून झाली. ही चांगली घटना आहे. आता सर्वांना विश्वासात घेउन विकासाची कामे करा, असा सल्ला सुद्धा नवनिर्वाचित सदस्यांना पवारांनीं दिला होता
.
या वेळी पवार यांनी सत्तांतरावेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडीची माहिती विचारून घेतली. महापौर निवडीवेळी किती सदस्यांनी आघाडीला मतदान केले, किती गैरहजर राहिले याची विचारणा केली.भाजपने ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर हल्ले करीत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले, त्यांना चोख प्रत्युत्तर सांगलीतून मिळाले असून ही सुरुवात आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Team Global News Marathi: