जाणून घ्या बहुगुणी तमालपत्रांचे आरोग्यदायी फायदे..!!!

आरोग्यवर्धक :- तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण असतात. तमालपत्रामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम असे आरोग्यदायी घटक असतात. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आढळून येतात.

तमालपत्रांचा उपयोग जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी केला जातो. या बरोबरच तमालपत्रांच्या पानांपासून तेल काढले जाते. आज जाणुन घेउयात बहुगुणी तमालपत्रांचे आरोग्यदायी फायदे.

सर्दी झाल्यास तमालपत्र पाण्यात उकळवा. त्यानंतर या उकळलेल्या पाण्यात स्व च्छ कपडा भिजवून, रुग्णाचे डोके व छाती शेकवा असे केल्याने आराम मिळतो.

तमालपत्रांच्या तेलात वेदना कमी करण्याचे गुणधर्म असतात. सांधेदुखीचा त्रास होत असल्यास थोडेसे तमालपत्रांचे तेल हातावर घेउन हलक्या हाताने वेदना होणाऱ्या भागावर लावा असे केल्याने वेदना कमी होण्यास मदत मिळेल.

स्वयंपाकात तमालपत्राचा वापर नियमित केल्यास अन्नपचनाला मदत मिळते. अपचनचा त्रास असल्यास आहारात तमालपत्राचा उपयोग अवश्य करावा. आहारात तमालपत्राचा वापर केल्याने शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

तमालपत्रामध्ये व्हिटॅमिन ए असते. आहारात तमालपत्राचा वापर केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी चहामध्ये तमालपत्राच्या पानांचा उपयोग केला जाऊ शकतो. निद्रानाशाचा त्रास होत असल्यास तमालपत्राच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्याने चांगली झोप येते.

आपल्याला बहुगुणी तमालपत्रांचे आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: