शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर नेमका कशाचा झेंडा फडकवला ?

शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर नेमका कशाचा झेंडा फडकवला ?

 

नवी दिल्ली — दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चमधील काही आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यापैकी काही आंदोलकांनी थेट दिल्लीतील लाल किल्ल्यावर चढाई केली. या ठिकाणी या आंदोलकांनी लाल किल्ल्यावर एक वेगळा झेंडा फडकावला. त्यानंतर हा झेंडा कशाचा आहे आणि त्याचा इतिहास काय असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्याचाच मागोवा घेणारा हा खास रिपोर्ट.

शेतकरी आंदोलनातील काही आक्रमक आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावलेला झेंडा म्हणजे शिख संप्रदायाचा धार्मिक झेंडा ‘निशाण साहिब’ आहे.

शिख धर्मात या झेंड्याला फार महत्त्व असून खूप पवित्र मानला जातो. हा त्रिकोणी आकाराचा झेंडा कॉटन कापड किंवा रेशमच्या कपड्यापासून तयार केला जातो. या झेंड्याच्या वरच्या भागात एक लटकनही असते. झेंड्याच्या मधोमध शिख धर्माचं पवित्र तलवारींचं चिन्ह असतं. त्याचा रंग निळा असतो.

 


हा निशाण साहिब ध्वज ज्या खांबावर फडकवला जातो त्यावर देखील वरच्या बाजूला दुधारी तलवार असते. या खांबावरील तलवारीचं वेगळं महत्त्व आहे. त्याचा अर्थ शिख धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माचा व्यक्ती ईश्वराची आराधना करण्यासाठी धार्मिक स्थळात प्रवेश करण्यास स्वतंत्र आहे. निषाण साहिबला खालसा (शिख) धर्माचं परंपरागत चिन्ह/प्रतिक मानलं जातं. गुरुद्वाराच्या कळसावर किंवा उंचीच्या ठिकाणी फडकावल्याने ते लांबूनही सहज दिसते. निशाण साहिब शिख धर्माच्या अस्तित्वाचं प्रतिक आहे.

बैसाखीच्या मुहुर्तावर हा ध्वज खाली उतरवला जातो आणि दुधाने अभिषेक केला जातो. निशान साहिबचा नारंगी रंग फिका पडल्यानंतर तो बदलला जातो.

भारतीय सैन्यातील शिख सैनिकांकडूनही निशान साहिबचं ध्वजारोहन

निशान साहिब ध्वजाचं धार्मिक महत्त्व आणि पावित्र्य खूप असल्याने भारतीय सैन्यातील शिख सैनिकही आपआपल्या कामाच्या ठिकाणी हा ध्वज फडकावत असतात. यावरुनच आंदोलकाच्या समर्थकांकडून या ध्वजाच्या बदनामीवर टीका होतेय.

निशान साहिबचा इतिहास काय?

निशान साहिब झेंडा आधी लाल रंगाचा असतो असंही सांगितलं जातं. नंतर त्याचा रंग बदलून पांढरा केला जातो. काही काळाने त्याचा रंग नारंगी करण्यात आला. 1709 मध्ये सर्वात आधी गुरु हरगोविंद यांनी अकाल तख्तवर केसरी रंगाचा निशान साहिब फडकावला होता. सध्या निहंगकडून चालवल्या जाणाऱ्या गुरुद्वारांवर निशान साहिब झेंड्याचा रंग निळा असतो.

ग्लोबल न्युज नेटवर्क: