विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर तणावाची परिस्थिती, काँग्रेस-भाजपा कार्यकर्त्ये आमने-सामने !

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत दिलेल्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.पंतप्रधानांनी केलेले विधान महाराष्ट्राची बदनामी करणारं आहे. त्यांनी माफी मागायला हवी अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतला आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयासमोर आंदोलन केले होते. आता राज्यातील प्रमुख भाजपा नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करु असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं होतं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर काँग्रेस कार्यकर्ते पोहचले होते. तेव्हा भाजपा कार्यकर्तेही फडणवीसांच्या घराबाहेर जमले. यावेळी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी फडणवीसांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. भाजपा कार्यकर्त्यांचीही पोलिसांना धरपकड सुरु केली आहे.

तसेच मोठा वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सागर बंगल्याकडे जाणारे रस्ते दोन्ही बाजूने बंद केले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवा, आंदोलन आम्हीही आक्रमक करु शकतो. तुम्हाला खासदारांच्या घरासमोर आंदोलन करायचे असेल तर उत्तर मुंबईतून सुरु करा असं आव्हान खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिले आहे. य प्रकारामुळे मुंबईतील वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Global News Marathi: