विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लावलेले आरोप सचिन वझे यांनी फेटाळले

मुंबई : उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जी स्फोटकांने भरलेली गाडी पार्क करण्यात आली होती, त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर येथे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकारावर संशय घेताना नेमण्यात आलेले सचिन वझे यांचे नाव घेऊन काही प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नाला आता सचिन वझे यांनीं प्रतिक्रिया दिलेली आहे.

सचिन वझे यांची फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना माध्यमांवर प्रतिक्रिया देत असताना देवेंद्र फडणवीसांचे आरोप फेटाळत मनसुख हिरेन प्रकरणाबाबात मला काहीच माहीत नाही. आता खबर मिळाल्यानंतर मी तिकडेच निघाल्याचे सचिन वझे यांनी म्हटले आहे.

यावर बोलताना वझे म्हणाले की, रात्री उशिरा एका पत्रकाराने फोन करून पोलीस तुमच्याकडे संशयित म्हणून पाहत असल्याचेही तक्रारीत म्हटले, असे माझ्या कानावर आले आहे, असे वझे यांनी सांगितले. तुमचे आणि हिरेन याचं याआधी अनेकदा बोलणे झाले असा दावा फडणवीस यांनी केला आहे, असे विचारले असता त्यांनी तसे बोलू देत. त्याबाबत तेच तुम्हाला सागू शकतील, असे उत्तर वझे यांनी दिले.

तसेच वझे सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचल्याचा फडणवीसांचा दावा फेटाळला आहे. माझे म्हणाले की, घटनास्थळी मी पहिला गेलो नाही. सर्वात आधी गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस, नंतर परिमंडळ दोनचे उपायुक्त आणि त्यांच्या पाठोपाठ क्राइम ब्रॅन्चची टीम तिथे पोहचली. मी त्यात होतो, असे वझे म्हणाले.

Team Global News Marathi: