कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो, निवडणूक आयोगाने घेतली हरकत

निवडणूक आयोगाने कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्याचा आदेश संबंधित खात्याला दिला आहे. सदर माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या प्रमाणपत्रावर तृणमूल काँग्रेसने हरकत घेतली होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे.

निवडणुंक आयोगाने बजावलेल्या आदेशाप्रमाणे, ज्या राज्यांत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे तिथे मोदी यांच्या फोटोचा वापर दिल्या जाणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावर केला जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने आरोग्य मंत्रालयाला निवडणूक नियमांचे कडक पालन करण्यास बजावले आहे.

येणाऱ्या काही दिवसात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुच्चेरी या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. या राज्यांत आरोग्य मंत्रालयाला यापुढे लसीकरण प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा फोटो छापता येणार नाही. यासाठी आरोग्य मंत्रालयाला विशिष्ट ‘फिल्टर’चा वापर करावा लागणार आहे. यंत्रणेत या फिल्टरला अपलोड करण्यासाठी वेळ लागणार असल्याचंही सांगण्यात येतं आहे त्यामुळे निवडणूक जाहीर झालेल्या राज्यात यापुढे प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरण्यात मज्जाव करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: