‘माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव’ या नेत्याचा खुलासा

 

माजी खासदार दत्ता मेघे आणि केद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची मैत्री राजकीय पटलावर जगजाहीर आहे. मात्र एका माजी कसदार मेघे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेक. मृत्यूपत्रात कुठलाही घोळ होऊ नये यासाठी माझ्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव लिहिल्याचा गौप्यस्फोट मेघे यांनी जाहीरपणे केला.

नगरपालिकेच्या विकासकामांचे ई भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात मेघे यांनी ही गोष्ट उघड केल्याने अनेकांसाठी तो चर्चेचा विषय बनला आहे. दत्ता मेघेंनी मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव का आणि कशासाठी लिहिलं आहे? याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. मात्र मेघेंच्या या वक्तव्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.

मेघे म्हणाले की, माझे सर्व पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. नितीन गडकरी हे आमच्या कुटुंबातील महत्त्वाचे नेते आहेत. मी माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये यासाठी त्यांचं नाव दिलं आहे, असं त्यांनी म्हटलंय. एका राजकारण्यानं ज्या पक्षात स्वत:ची हयात घालवली त्या पक्षातील अथवा स्वत:च्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचं मृत्यूपत्रात नाव नाही परंतु ज्या पक्षात नव्याने सहभागी झालो तेथील नेत्याचं नाव घेतलं ही आश्चर्याची गोष्ट आहे.

 

Team Global News Marathi: