“आघाडीच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार महाराष्ट्रातील जनताच मोडेल”

 

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून वाघ मेंढराच्या कळपात शिरल्यावर जी अवस्था होते तशी भाजपाची झाली आहे असं म्हणत सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर शरसंधान साधलं. त्यावर आता भाजपानेही शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन म्हटलंय की, स्वत:ला वाघ म्हणवणारे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात घुसून शेळी कधी बनले त्यांनाही कळालं नाही. बरं झालं, महाविकास आघाडीत सामील झाल्यानं हिंदुत्वाचा बुरखा फाटला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही हे वारंवार दाखवून दिलं असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच देशात लिहिण्याचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य उरलंय का? असा म्हणता, ते स्वातंत्र्य आहे म्हणूनच तुम्ही अग्रलेख लिहिताय. तुमच्या सरकारविरोधात बोलणाऱ्यांना मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण केली जाते. ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होत नाही म्हणून रिक्षाचालकांना मारहाण, दुकानदारांना शिवीगाळ केली जाते. महाविकास आघाडीच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार ही महाराष्ट्रातील जनताच मोडेल असा टोलाही केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडलं होतं. केंद्रातले भाजपा सरकार आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण देशात बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आज खरेच उरले आहे का? जे सरकारला प्रश्न विचारतात, खडे बोल सुनावतात त्यांच्यावर सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकर खात्याच्या धाडी घालून दहशत निर्माण केली जाते. खोटे गुन्हे दाखल करून रावणी राज्याची पताकाच फडकवली जाते. याला काय स्वातंत्र्य म्हणायचे? असा सवाल त्यांनी विचारला. शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मागण्याचे स्वातंत्र्य नाही.

Team Global News Marathi: