आंतरराष्ट्रीय गुंडांना पण माझा नाव माहिती आहे – गणेश नाईक

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपचे नगरसेवक फोडल्याने पक्षातील गळती थांबवण्यासाठी आता थेट भाजप नेते गणेश नाईकच रिंगणात उतरले आहेत.

शिवसेनेच्या गुंडांना अजिबात घाबरू नका. काही लफडे झाले तर मला अर्ध्या रात्री फोन करा. मी येईल. इथल्याच काय आंतरराष्ट्रीय गुंडांनाही गणेश नाईक माहीत आहे, असे गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध गणेश नाईक असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहे.

नेरुळ येथे गणेश नाईक यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नाईक अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेकडून होत असलेल्या फोडाफोडीवरही त्यांनी टीका केली.

शिवसेनेकडून दम देऊन नगरसेवक फोडले जात आहेत. शिवसेनेच्या गुंडागर्दीला घाबरू नका. काही लफडे झाले तर मला अर्ध्या रात्री फोन करा. मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी हजर राहील. हे गुंडले इथले नसून आंतरराष्ट्रीय गुंड फिरतात ना त्यांनाही गणेश नाईक माहीत आहे, असे नाईक म्हणाले आहेत .

Team Global News Marathi: