‘लखीमपूर खेरी प्रकरणाला हिंदू विरुद्द शीख युद्धात बदलण्याचा डाव’

 

उत्तरप्रदेश | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याप्रकरणी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला अटक उरकण्यात आलेली आहे. मात्र अटक केल्यानंतर त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य़ करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.आशिष मिश्राला अटक केल्यामुळे येथील आंदोलकांचा संताप काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, भाजपा नेते वरुण गांधी यांनी याप्रकरणावरुन गंभीर आरोप केला आहे.

वरुण गांधी मागील काही काळापासून सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता नुकत्याच झालेल्या लखीमपूरच्या घटनेवरुन केंद्रावर टीका करत आहेत. तसेच, काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या ट्विटर बायोमधून भाजपचे नावही हटवले आहे. त्यांच्या याच टीकेचा फटका त्यांना बसला आहे. खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर ठेवण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांबरोबर राहण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन लखीमपूर खेरी येथील घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ‘लखीमपूर खेरी प्रकरणातून हिंदू विरुद्ध शीख असा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे विधान अनैतिक किंवा खोटं आहे असे नाही. एका पिढीला बरं करण्यासाठी लागलेल्या जखमा पुन्हा ताज्या करणं, तसेच दोष-रेषा निर्माण करणं हे धोकादायक आहे,’ असे वरुण गांधी यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: