मला ट्रोल करणाऱ्यांची दया येते, अमृता फडणवीसांनी लगावला टोला

 

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणीवस सतत वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहत असतात तसेच महाविकास आघाडी सरकारवर नेहमीच निशाणा साधत असतात त्यातच आता त्यांच्या पोस्ट आणि ट्विटवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. स्त्री-समानतेचा विचार लहानपणापासून मनात रुजला होता असे त्यांनी बोलून दाखविले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, जडणघडणही तशीच झाली. मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. जशी आहे तशीच राहणार. ढोंगीपणा मला जमत नाही. मी जी मतं मांडते, ती माझी मतं असतात. मला ट्रोल करणाऱ्यांची दया येते. देव त्यांना सद‌्बुध्दी देवो, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी लवकरच महाराष्ट्राचे खरे प्रमुख होण्याचा प्रयत्न करावा, अशी टीकाही अमृता फडणवीसांनी केलीये. त्या ‘लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. सायन्स चांगलं होतं, पण डॉक्टरकी हा काही आपला प्रांत नाही, हे लक्षात आलं होतं. त्यामुळे कॉमर्स निवडलं. त्याचा फायदा म्हणजे, मला गाण्याकडे आणि टेनिसकडेही लक्ष देता आलं. त्यानंतर, ॲक्सिस बँकेत नोकरी लागली, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

Team Global News Marathi: