लैंगिक छळ प्रकरणात कोरियोग्राफर गणेश आचार्यला जामीन मंजूर

 

मुंबई | कोरिओग्राफर गणेश आचार्यला लैंगिक छळ प्रकरणात जामीन मिळाला आहे. मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. हे धक्कादायक प्रकरण फेब्रुवारी 2020 मधील आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याविरुद्ध एका महिला डान्सरने लैंगिक छळ प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी कोरिओग्राफरविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

कोरिओग्राफर गणेश आचार्य गुरुवारी न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा या प्रकरणात जामीन केला आहे. महिलेने फेब्रुवारी 2020 मध्ये गणेश आचार्य यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.त्यांनतर मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ माजली होती. तसेच अनेक सहकर्मचाऱ्यांनी यापूर्वीही गणेशवर लैंगिक छळाचे आरोप केले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, 35 वर्षीय को-डान्सरने सांगितलं होतं की, ”जर तिला यशस्वी व्हायचं असेल तर मे 2019 मध्ये तिला त्यांच्यासोबत सेक्स करावं लागेल. तिने नकार दिला आणि सहा महिन्यांनंतर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनने तिचं सदस्यत्व रद्द केलं’ मात्र या प्रकरणावर गणेश आचार्य यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलं होतं.

Team Global News Marathi: