कुत्र्याने मटण खाल्ल्याने वडिलांकडूनच पोटच्या मुलीचा गोळी झाडून खून

 

तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एक पित्याने मटणासाठी चक्क पोटच्या पोरीवर गोळी झाडून खून केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे हा खून जेवणासाठी बनवलेले मटण कुत्र्याने खाल्ल्याने वाद झाला आणि त्यातून वडिलाने मुलीचा जीव घेतला आहे सध्या आईला ताब्यात घेतले असून वडील फरार आहेत.

ही दुर्देवी घटना रविवारी सायंकाळी घटना तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे घडली आहे. आरोपी वडिलाने गोळी झाडून विवाहित मुलीची हत्या केली. आरोपी घटनेच्या वेळी नशेत असल्याचे म्हटले जात आहे. आरोपी वडील फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. वीस वर्षीय मृत काजल शिंदे ही तिच्या माहेरी पतीसह राहत होती.

रविवारी जेवणासाठी घरात मटण आणून काजलने रस्सा केला होता. मटणाचा रस्सा झाल्यानंतर ती घरात इतर कामे करत होती. त्याच वेळी एका कुत्र्याने जेवणासाठी तयार केलेले हे मटण खाल्ले. हा प्रकार काजलची आई मीराने पाहिल्यानंतर तिने याचा जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यातून दोघींमध्ये मोठी वादावादी झाली. या दरम्यान दारूच्या नशेत असलेले काजलचे वडील गणेश भोसले यांनी खुंटीवर टांगून ठेवलेल्या गावठी बंदुकीतून काजलवर गोळी झाली.

वडिलांनी झाडलेली गोळी काजलच्या छातीत लागल्याने ती गंभीर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काजलला तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गोळीबारात मृत्यू झालेल्या काजलचे पती मनोज सुनील शिंदे यांनी तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर गणेश भोसले व आई मीरा भोसले यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: