चंदीगड एमएमएस लिक प्रकरणाचे मुंबई धागेदोरे, महत्वाची माहिती समोर

 

चंदीगड एमएमएस लीक प्रकरणाचं मुंबई आणि गुजरात कनेक्शन आता समोर आलं असून आता मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात, चौथ्या व्यक्तीला कधीही अटक केली जाऊ शकते. आरोपी तरुणीकडे एक डिव्हाईस सापडलं असून ते तपासासाठी पाठवण्यात आलं आहे. या डिव्हाइसमध्ये व्हिडिओ सेव्ह केले होते.

सोमवारी चंदीगड विद्यापीठातील मोहालीच्या गर्ल्स हॉस्टेल एमएमएस प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका विद्यार्थिनीला आणि दोन तरुणांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तिघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रिमांडनंतर एसआयटीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सोमवारी सायंकाळपासून आरोपींची चौकशी सुरू आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या मोबाईलवर गुजरात आणि मुंबईतूनही फोन आले आहेत.त्यांचा त्यांच्याशी काय संबंध आहे, याची एसआयटी टीम चौकशी करत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात चौथा व्यक्तीही आहे, जो मुलीला ब्लॅकमेल करत होता. त्याला अद्याप अटक व्हायची आहे. त्याला पकडण्यासाठी पथक रवाना झालं आहे.

आरोपी विद्यार्थिनी जे व्हिडिओ आपला प्रियकर सनीला पाठवायची, ते व्हिडिओ सनी एका एका डिव्हाईसमध्ये साठवायचा. ते डिव्हाइस सनीकडून जप्त करण्यात आलं असून ते फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणी एसएसपी विवेक शील सोनी यांनी मोठा दावा केला आहे.

Team Global News Marathi: