कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सहकार पॅनेलचा सर्व २१ जागांवर दणदणीत विजय |

 

कराड | कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपा नेते डॉ. अतुल भोसलेंच्या सत्ताधारी सहकार पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे. या सहकार पॅनेलचा सर्व २१ जागांवर विजय झाला असून भाजपाच्या डॉ. अतुल भोसलेंकडून कारखाना आपल्या ताब्यात घेण्याचे दोन्ही काँग्रेस नेत्यांचे मनसुबे कृष्णेच्या सभासदांनी उधळून लावले आहेत.

कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी पार पडली. त्यावेळी तब्बल ३४५३२ सभासदांनी मतदान केले होते. आता या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मतमोजणीचा निकाल जाहीर झाला आहे.

या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सर्व २१ जागांवर दहा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून सहकार पॅनेलचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळे दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला होता. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. आता निकाल स्पष्ट झाले आहेत.

सातारा-सांगली जिल्ह्यात ४७१४५ सभासद असणाऱ्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने दणदणीत विजयी मिळवला. या निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. या कारखान्याची सत्ता भोसले गटाकडून दुसरीकडे जावी म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधक एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत.

Team Global News Marathi: