कोल्हापुरात पीएफआय संघटनेच्या एकाला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर

 

कोल्हापूर | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा हस्तक असल्याच्या संशयावरून काल कोल्हापूरात जवाहनगर आणि सुभाषनगरात छापा टाकण्यात आला यामध्ये कोल्हापुरातील एका हस्तकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्यावर मागच्या कित्येक वर्षांपासून संशय व्यक्त केला जात होता.

‘एनआयए’ व ‘एटीएस’च्या ‘रडार’वर आलेल्या आणि देशभर व्यापलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेचा हस्तक असल्याच्या संशयातून नवी दिल्ली व नाशिकमधील पथकाने त्या संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कोल्हापूरच्या जवाहरनगर-सुभाषनगर परिसरातील सिरत मोहल्ला येथील साहिल अपार्टमेंटमध्ये छापा टाकण्यात आला. यामध्ये राहणाऱ्या मौला नबीसाब मुल्ला (रबी सहाब मुल्ला) (वय 38) याला अटक करण्यात आली आहे.

पीएफआय संघटनेविरोधात एटीएसच्या पथकाने एकाचवेळी देशभर छापेमारी केली यामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आली आहे. दरम्यान त्याला नाशिक येथील न्यायालयाने 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मौला हा मुळचा कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जवाहरनगर-सुभाषनगर परिसरातील सिरत मोहल्ल्यातून संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Team Global News Marathi: