कोल्हापुरात जोरदार पावसाची बॅटिंग भल्या पहाटे उघडले राधानगरी धरणाचे दरवाजे

 

कोल्हापुर | कोल्हापुरात अक्षरश पावसानं धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. तर कोल्हापुरातील राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे कोल्हापुरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. कोल्हापुरातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजारा, गगनबावडा परिसरात पावसानं धुमशान घातलं आहे.

या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होत आहे. या पावसामुळे धरण 100 टक्के भरले आहे. धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा उघडला आहे. पहाटे साडेपाच वाजता हा दरवाजा उघडण्यात आला. एका दरवाज्यातून प्रतीसेकंद 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. पावर हाऊस मधून 1600 क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे.

राधानगरी धरणातून एकूण 3028 क्युसेक विसर्ग पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीमध्ये सुरू आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. नदी आता धोका पातळीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. भोगावती नदीकडच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान राधानगरी धरण 100 टक्के भरल्याने कोल्हापूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली.

Team Global News Marathi: