काँग्रेसने पुन्हा उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयावर दर्शवली नाराजी

 

मुंबई | विधान परिषद विरोधी पक्षनेते नियुक्ती प्रकरणावरून काँग्रेसने शिवसेनेवर नाराज दाखवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याशी चर्चा न करताच अंबादास दानवे यांची नियुक्ती केल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेची पुन्हा एकदा मोट बांधत आहे. त्यामुळे सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांच्या जागी तातडीने निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे नाव देऊन विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लावली आहे.

अंबादास दानवे यांच्या निवडीमुळे काँग्रेस नाराज झाली आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते निवड प्रकरणात काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतले नाही, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस पक्षाला उद्धव ठाकरे गटाने विचारले सुद्धा नाही त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडी आहेत की नाही यावर शंका व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे.

शिंदे हे आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करत आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे विधानपरिषद मध्ये विरोधी पक्षनेते आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे विधान परिषदेत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे. अशातच विधान परिषद विरोधी पक्षनेते नियुक्ती प्रकरणावरून काँग्रेस नाराज झाली आहे.

Team Global News Marathi: