महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी आता होणार 1 ऑगस्टला

 

शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होती. आता न्यायालयाने यासाठी पुढील तारीख दिली आहे.सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधिश एन. व्हि रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठांसमोर या विविध खटल्यांची सुनावणी सुरु होती. न्यायालयाने दोनही पक्षांचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यावर पुढील सुनावणीसाठी 1 ऑगस्ट तारीख दिली आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार त्यांच्या गटात गेले. त्यानंतर शिवसेनेने शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली होती. त्याच्या विरोधात शिंदेगटाने आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिंदे गटाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेत, शिंदे गटाचे 16 उमेदवार अपात्र ठरत असल्याचा, 40 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष निवडीत आणि बहुमत चाचणी प्रक्रियेत व्हिपचे उल्लंघन केल्याचा आरोप करत न्याय मागितला आहे. तसेच राज्यपालांनी शिंदे गटाला दिलेली शपथ अवैध असल्याचा देखील दावा केला आहे. अपात्रतेची नोटीस असताना शपथविधी अवैध असल्याचा देखील दावा केला आहे. शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी हा युक्तीवाद केला आहे.

तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे यांनी यावेळी न्यायालयात युक्तीवाद केला. साळवे म्हणाले, शिवसेनेचे दोन तृतीअंश आमदार वेगळे झाले असल्याने त्यांना पक्षांतरबंदीच्या कायद्याची काळजी नाही. तसेच अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांना नेतृत्वात बदल हवा आहे आणि त्यांनी पक्षात राहून हा बदल घडविणे म्हणजे बंडखोरी नाही, असा युक्तीवाद केला आहे.

कोल्हापुरात दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे पुन्हा नवे आव्हान

लता मंगेशकरांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आता होणार पूर्ण; कुटूंबियांची घोषणा

Team Global News Marathi: