कोल्हापूरच्या बंडखोर खासदारांना पाडण्यासाठी शरद पवारांचा मेगा प्लॅन

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत शिवसेनेच्या 12 खासदारांनी बंडखोरी केली. दरम्यान या 12 खासदारांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही शिवसनेचे खासदार शिंदे गटात गेल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आगामी निवडणुकांमध्ये खासदार कोण अशी चर्चा रंगली आहे. खासदार संजय मंडलीक आणि खासदार धैर्यशिल माने यांनी केलेल्या बंडखोरीने जिल्ह्यातील राजकारण नव्या वळणावर आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना फोन करून लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिवसेनेचे असल्याने त्यांनी महाविकास आघाडीतून फारकत घेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. दरम्यान कोल्हापूर हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोन्ही मतदार संघावर नजर ठेवून असणार आहेत. यासाठी ते आतापासूनच कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

अशातच लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला नवीन उमेदवारांची तयारी केली पहिजे. त्यासाठी आता आपण लक्ष घालावे, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांना फोवरून दिल्या आहेत. दरम्यान, लोकसभेची निवडणूक लढविण्याची आपली इच्छा नाही; परंतु पक्षाने आदेश दिल्यास तो आपण नाकारू शकत नाही, असे मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी भाजपात आणि मूळ शिवसेनेत चढाओढ

एकनाथ शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था का नाकारली, सुहास कांदे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

Team Global News Marathi: