कोल्हापुरात व्यापार होणार सुरु, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

 

कोल्हापुर | कोल्हापुरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी कोल्हापुरात जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली होती.

त्यातच कोल्हापूरमध्ये कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याने सोमवारपासून शहरातील सर्व व्यापार सुरू करण्यास परवानगी देऊ, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी सरसकट व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. या मागणीला टोपेंनी दुजोरा दिला आहे.

कोल्हापुरात आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापुरात सगळी दुकाने सुरु करण्याचा निर्णय दिला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर कमी झाल्याने व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या सुचनांचं पालन करावे लागणार आहे. सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात व्यापार सुरू करण्यास परवानगी दिल्याने व्यापारी शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

Team Global News Marathi: