आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते, देशमुखांच्या कारवाईवर मुश्रीफ यांची शंका |

 

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून या कारवाईत ईडीने देशमुख यांची सुमारे चार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. या कारवाईवरून राष्ट्रवादीचे नेते आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ईडीलाच सवाल केला आहे. एखाद्या आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते?, असा सवालच हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार माध्यमांशी संवाद साधला. परमवीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी मुकेश अंबानी यांच्या घरा बाहेर स्फोटक ठेवली त्याचा उलगडा झाला नाही.

तसेच स्फोटक का ठेवण्यात आली तसेच या मागचा मास्टर माईंड कोण याचा शोध एनआयए घेऊ शकली नाही. वाझेची चौकशी बाजूलाच राहिली. आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते?, असा सवाल करतानाच मुद्दाम हे षडयंत्र सुरू असून भारतीय जनता पक्षावर त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

Team Global News Marathi: