कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या तापायला पोहचलेला असताना आता दुसरीकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सभेवर दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. आता त्यापाठोपाठ करुणा मुंडे यांनीही आपल्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आता या निवडणुकीत शिवशक्ती सेनेतर्फे करुणा शर्मा मुंडे यांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे. बिंदू चौकात प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीत येऊन बसला. कार्यकर्त्यांनी त्याला विचारणा केली असता त्याने आरडाओरडा केला. त्यानंतर त्याने कार्यकर्त्यांला गाडीतच मारहाण केली, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, मी ज्या ज्या ठिकाणी सभा घेते त्या ठिकाणी ही व्यक्ती दिसून येते, असा आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे. ‘राज्यात महिला सुरक्षित नाही, ही गुंडागर्दी कधी थांबणार आहे, यासाठीच मी उत्तर कोल्हापूरमध्ये निवडणूक लढवत आहे. पण, त्यामुळे माझ्यावर दबाव टाकला जात आहे. मला पोलीस सुरक्षा मिळावी यासाठी मी अर्ज केला होता.
राज्यपालांकडेही अर्ज केला होता होता. त्यांनी तो अर्ज गृहखात्याकडे दिला आहे, पण राज्यपालांनी सांगूनही सरकारकडून मला सुरक्षा पुरवण्यात येत नसल्याचा आरोप मुंडे यांनी केला. चित्रा वाघ यांच्याही सभेवर दगडफेक केल्याचा आरोप दरम्यान, भाजपच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या सभेत दगडफेक केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.