कोल्हापुरात पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगणार, महाविकास आघाडीत वाद होण्याचे चिन्ह

 

कोल्हापूर : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात पोटनिवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिलला मतदान तर 16 एप्रिलला मतमोजणी केली जाणार आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 24 मार्च ही शेवटची तारीख आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त आहे.

तर दुसरीकडे या जागेवर बिनविरोध निवडणूक व्हावी, असा सत्ताधारी पक्षाची भूमिका आहे. पण याआधीच्या राज्यातील झालेल्या पोटनिवडणुका पाहता कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. विशेषत: या निवडणुकीसाठी काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. तर भाजप त्यांच्या एका उमेदवाराला संधी देईल. अशी एकंदरीत ही दुहेरी लढत असणार आहे.

Team Global News Marathi: