कोल्हापूर उत्तर पोट निवडणूक | सतेज पाटलांची ‘मिसळ पे’ तर चंद्रकांत पाटलांची ‘चाय पे चर्चा’

 

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. या जागेवर काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून पालमंत्री सतेज पाटील यांनी ‘मिसळ पे’ चर्चा केली तर आज चंद्रकांत पाटील यांनी ‘चाय पे चर्चा’ केली. पाटील यांनी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी रंकाळा परिसरात संवाद साधला. यावेळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी चंद्रकांत पाटील यांनी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी ‘चाय पे चर्चा’ केली.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मस्जिद परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी झणझणीत कोल्हापुरी मिसळचा आस्वाद घेतल्याचे पाहायला मिळाले. या भागातील नागरिकांशी विकासात्मक कामे आणि विविध बाबींवर त्यांनी चर्चा केली.

Team Global News Marathi: