कोल्हापूर उत्तर | शिवसेनेनं बालेकिल्लाच दिला ‘काँग्रेस’ला, १०० टक्के होणार भाजपाला फायदा

मुंबई | शिवसेना पक्षच जुना बालेकिल्ला असलेला मतदारसंघ शिवसेनेनं काँग्रेसला सोडल्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सदर हा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मिळून घेतला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असून २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर निवडणून आले होते.

मात्र, यावेळी शिवसेनेनं काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या पक्षाच्या नेत्यांसह शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेच्या या भूमिकेचा फायदा भाजपला होऊ शकतो, असा अंदाज आहे. चंद्रकांत पाटील यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची जागा रिक्त झाली. यामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. या मतदारसंघावर सुरूवातीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेणार याकडे महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष, शिवसैनिक आणि कोल्हापूरकरांचं लक्ष होतं.

शुक्रवारी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शिवसेना उमेदवार देण्याची शक्यता दिसत होती, मात्र पक्षाने मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत पंढरपूर आणि देगलूरप्रमाणेच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत बघायला मिळाणार आहे.

Team Global News Marathi: