कोल्हापूर हे विसरणार नाही; गोकुळची निवडणूक झाल्यावर सत्तापिपासू पालकमंत्र्यांनी लॉकडाऊन केला – शौमिका महाडिक

सध्या संपूर्ण राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. अशातच आता कोल्हापुरात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. याच मुद्द्यवरून आता नवनिर्वाचीत गोकुळच्या संचालिका आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे.

या संदर्भात महाडिक यांनी ट्विट करून सतेज पाटलांवर टीका केली आहे कोरोना वाढलाय निवडणूक नको अशी भूमिका आम्ही घेतली असताना तेव्हा हट्ट आणि आता गोकुळ निवडणूक झाल्यावर मग लॉकडाऊन अशी भूमिका घेणाऱ्या पालकमत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय. तेव्हा माणसं मरत नव्हती का ? कोल्हापूर ही गोष्ट कधीही विसरणार नाही.’ असा संताप शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज तडकाफडकी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून ते १५ मे पर्यंत १० दिवसांचा कडक लॉकडाऊन कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आला आहे. या निर्णयानंतर सामान्य कोल्हापूरकरांनी देखील नाराजी व्यक्त केली असून निवडणूक झाल्यानंतरच लॉकडाऊन का ? याआधी गरज असताना राजकीय फायद्यासाठी टाळाटाळ केली का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Team Global News Marathi: