चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी – हसन मुश्रीफ

मंत्री छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट भुजबळांना इशारा दिला होता. “जास्त बोलू नका तुम्ही जामिनावर बाहेर आला आहेत” असे वक्तव्य करत थेट इशारा दिला होता. या विधानावरून संपूर्ण राष्ट्रवादी चंद्रकांत पाटलांवर तुटून पडली होती. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. परंतु ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल पाटील यांनी केलेले दर्पोक्तीयुक्त वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे, असं मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, जणूकाही जामीन कोर्टातून रद्द करणार, अशा आविर्भावात चंद्रकात पाटील वक्तव्य करत होते. भुजबळ साहेबांनी संपूर्ण हयात राजकारण आणि समाजकारणात काढली आहे. त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

दरम्यान, छगन भुजबळांनी पश्चिम बंगालच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती. मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते की, ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या. मै अपना बंगाल नहीं दुंगी अशी प्रतिज्ञा ममता यांनी केली होती. मोदी, अमित शाह यांच्या एक दिवसआड सभा होत होत्या. 8 ते 10 मंत्री ठाण मांडून बसले होते पण उपयोग झाला नाही. आसाम वगळता भाजपला कुठेच साथ नाही.

Team Global News Marathi: