कोल्हापूर जिल्ह्य पुन्हा सात दिवसाचा लॉकडाऊन

कोल्हापूर जिल्ह्य पुन्हा सात दिवसाचा लॉकडाऊन

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्नांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्हयात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्नांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार पासून सात दिवसासाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे

कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात येत्या सोमवार पासून सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आलेला आहे.

कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.

मात्र यासाठी जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपली-आपली जबादारी ओळखून अनावश्यक घरा-बाहेर पडणे टाळले पाहिजे. सोशल डिस्टसिंगचे नियम योग्य पद्धतीने व काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: