कोल्हापूर पोटनिवडणूक | जाधव, कदम उद्या भरणार अर्ज, शक्तीप्रदर्शनासाठी जय्यत तयारी

 

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे दिगवंत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव तर भारतीय जनता पक्षामार्फत नाना कदम उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या दिवशीच शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही पक्ष सज्ज झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोल्हापूरला परतले आहेत. जयश्री जाधव यांना आमदार करूनच ‘मातोश्री’वर घेऊन येऊ, असा शब्द त्यांनी ठाकरे यांना दिला आहे. आतापर्यंत २९ जणांनी ५८ अर्ज नेले असून, एकाच उमेदवाराने सोमवारी अर्ज दाखल केला. यासाठी अर्ज भरण्याची मुदत २४ पर्यंत आहे.

जयश्री जाधव या बुधवारी अर्ज दाखल करणार असून, यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र आणत शक्तीप्रदर्शन करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंबर कसली आहे.

Team Global News Marathi: