कोल्हापुरला महापुराचा धोका; NDRF ची टीम रवाना !

 

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोल्हापुर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणीपातळी ३६ फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याहून कोल्हापूरकडे एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना झाल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. आज सकाळी आठ वाजता पुणे येथून दोन पथके कोल्हापूरसाठी रवाना झाली असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. 39 फूट ही पंचगंगा नदीची इशारा पातळी असून सध्या नदीची पातळी ३६ फूट आहे. धोक्याची पाणी पातळी गाठण्यासाठी पंचगंगा नदीत ४ फूट पाणी कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात असाच पाऊस राहिल्यास पंचगंगा नदी लवकरच धोक्याची पातळी ओलांडेल.

Team Global News Marathi: