राज्याचे प्रश्न कोमात अन् स्वबळाची छमछम जोरात, आशिष शेलारांनी लगावला टोला |

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकदा तिन्ही पक्षात वाद होत असल्याचे चित्र दिसून येत होत. त्यात नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देऊन आघाडीत बिघाडी आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पटोले यांच्या या विधानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवारांनी नाराजी दर्शवली होती.
त्यानंतर भाजपने संधी साधत महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली होती. आता पुन्हा भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

स्वबळावर लढणार, आम्ही स्वबळावर लढणार. एक म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, अशी तिन्ही सरकारमध्ये रोज सकाळ संध्याकाळ एकच चर्चा असते. दुसरा म्हणतो त्यावर अग्रलेख लिहिणार, तर तिसरा म्हणतो दुसऱ्याला भेटायला जाणार, मग सगळे एकत्र भेटतात, अशी सगळी स्वबळाची छमछम राज्यात सुरू आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. राज्यात बाकी काही ऐकू येत नाही. फक्त लेडिज बारची छमछम ऐकू येते, असंही शेलार म्हणाले.

मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, पाऊस, पूर, कोरोना, लॉकडाऊन,शेतकरी, बियाणे, खते, पिक वीमा, वीज, अडचणी आलेले अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी असे राज्यासमोर अनेक प्रश्न पडले आहेत. मात्र, सगळे प्रश्न कोमात आणि सरकारमधील तीन पक्षांमध्ये स्वबळाची छमछम जोमात असं चित्र राज्यात आहे, अशी टीका देखील आशिष शेलार यांनी केली आहे.

Team Global News Marathi: