कोहिनूत टॉवर एकदमच हलायला लागला’ भुजबळांचा राज ठाकरेंना जोरदार टोला

 

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्याला केलेली भाषणावरून आता राजकारण तापू लागले असुन राज ठाकरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलेली टीकेला आता प्रतिउत्तर दिले आहे. ‘राज ठाकरे यांचा गुडीपाडव्याचा मेळावा होता की भाजपचा मेळावा होता हे काही कळायला मार्ग नाही. ईडीने एकदा काय नोटीस बजावली तर इंजिनने लगेच यू-टर्न घेतला, कोहिनूर टॉवर लगेच हालायला लागला’ अस म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

दोन वर्ष जेलमध्ये राहून आलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिले ते काय स्वातंत्र्य सेनांनी होते का? असा सवाल करत राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना भुजबळ यांनी राज यांना जशास तसे उत्तर दिले. आता या आरोप-प्रत्यारोपावरून दोन्ही पक्षातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या आधी राज ठाकरेंनी कडवा विरोध भाजपने केला होता पण काल त्यांनी अचानक टर्न घेतला. असं वाटत होतं की, ही भाजपची सभा आहे. त्यांनी माझ्यावर पण टीका केली. मला मंत्रिपद मिळाले वगैरे, पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतच होतो, असा ट्रॅक कधी बदलला नाही त्यामुळे मला राष्ट्रवादीने बक्षीस म्हणून शपथविधीला पहिले पाचारण केले, असा पलटवार भुजबळांनी राज ठाकरेंवर केला.

Team Global News Marathi: