खडसे राष्ट्रवादीत आल्यानेच त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले गेले – जयंत पाटील

 

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहेत. आज सकाळी ११ वाजता ईडीने खडसेंना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच ते आज ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. याच पार्श्वभूमीवर आता प्रदेशाध्यक्ष जाण्यांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत केलेल्या कारवाईचा विरोध केला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचा फार जुना राग असून खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिलं गेलं नाही. ओबीसी नेतृत्व असल्यानं त्यांना बाजूला करण्यात आलं. त्यांच्यावर ज्या प्रकरणी कारवाई सुरू आहे त्यात अद्याप तथ्य आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही.पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, अस जयंत पाटील यांनी म्हंटल.

खडसे यांनी राष्ट्रवादीत सन्मानानं प्रवेश दिल्यानं चिडून जाऊन भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. खडसेंना चुकीच्या पद्धतीनं अडकवत आहे. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळं चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Team Global News Marathi: