‘किसी का भाई किसी की जान’च्या यशानंतर सलमान खान याने मानले चाहत्यांचे आभार

 

दबंग खान अभिनेता सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा २१ एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. दोन दिवसांत सिनेमाने 40 कोटींची कमाई केल्याने सलमान भारावला आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सलमान खान याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

सलमानने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सलमानने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला असून त्याचा डॅशिंग लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.हा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिलं आहे,”तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप आभार… तुमचं प्रेम आणि पाठिंब्याचं मला कौतुक वाटत आहे” असं लिहीत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहे.

सलमानचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच त्याच्या फोटोवर चाहते कमेंट्स करत आहेत. आभार मानण्याची गरज नाही. हे आमचं कर्तव्य आहे, ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाच्या माध्यमातून भाईजानने आम्हाला वेड लावलं आहे, आमचा लाडका भाईजान.. सलमान खान.. सुपरहिट सिनेमा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

 

Team Global News Marathi: