किरीट सोमय्या आता निघाले सांगलीला वाचा काय आहे कारण ?

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते, माजी खासदारकिरीट सोमय्या यांनी आघाडी सरकार मधील अनेक मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. तसेच ते सर्वांसमोर उजेडात सुद्धा आणले होते. आहि दिवसांपूर्वी त्यांनी कोकणात परिषद घेऊन थेट मंत्री अनिल परब यांचा घोटाळा उघडीस आणला होता. आता त्यांनी आपला मोर्चा सांगलीकडे वळवला आहे.

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परब यांची सचिव बजरंग खरमाटे यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.खरमाटे हे सांगली जिल्ह्यातील आहेत. किरीट सोमय्या हे खरमाटे यांच्या संपत्तीची माहिती घेऊन पाहणी करण्यासाठी स्वतः सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे.

त्यांच्या ट्विट मध्ये त्यांनी ” उद्या मी सांगली येथील अनिल परब यांचे सचिव बजरंग खरमाटे यांची बेनामी संपत्ती पाहण्यासाठी जात आहे, तासगाव येथील फार्म हाऊस, चिखलहोळ येथील पाईप फॅक्टरी, बेडग येथील १५० एकर जमीन आणि कुपवाड एमआयडीसी येथील पाच एकर जमीन येथे जात आहे” असं म्हंटले आहे.

Team Global News Marathi: